Ad will apear here
Next
‘मुंबई सेंट्रल टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या’
मुंबई : ‘भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस देण्यात यावे,’ अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. या मागणीसाठी लवकरच रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस देण्यात यावे, ही मागणी मागील दहा वर्षांपासून रिपब्लिकन पक्ष करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी मुंबई राहिली आहे. मुंबईत त्यांचे वास्तव्य प्रदीर्घ काळ होते. त्यांनी उभारलेला मानवमुक्तीचा लढा मुंबईतून त्यांनी लढविला. मुंबईत त्यांच्या अनेक आठवणी आहेत. त्यामुळे मुंबई सेंट्रल या पश्चिम रेल्वे वरील मोठया महत्त्वपूर्ण टर्मिनसला त्यांचे नाव द्यावे, अशी आंबेडकरी जनतेची अनेक वर्षांपासून मागणी आहे.’

‘मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे; तसेच मध्य रेल्वेच्या व्हिक्टोरिया टर्मिनसचे (व्हीटी) नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नामांतर करण्यात आले आहे. त्या नामांतराचे आंबेडकरी जनतेने स्वागत केले असून, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आंतरराष्ट्रीय  विमानतळ आणि मध्ये रेल्वे टर्मिनसला दिल्याबद्दल अभिमान वाटत आहे. त्याप्रमाणे मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी ‘आरपीआय’ची मागणी आहे. ही मागणी मंजूर करून  मुख्यमंत्र्यांनी मुंबई सेंट्रल टर्मिनसचे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे टर्मिनस असे नामांतर करण्याचा ठराव राज्य सरकारतर्फे रेल्वे मंत्रालयाला त्वरित पाठवावा, यासाठी आपण मुख्यमंत्री फडणवीस, आणि रेल्वेमंत्री गोयल यांची लवकरच भेट घेणार आहोत,’ असे आठवले यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZQOBT
Similar Posts
‘आरपीआय’चा ६१वा वर्धापनदिन सोहळा तीन ऑक्टोबरला मुंबई : ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (आरपीआय) ६१वा वर्धापनदिन तीन ऑक्टोबरला ठाण्यातील ढोकाळी येथील हायलँड मैदानात आयोजित करण्यात आला असून, या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. या वेळी ‘आरपीआय’च्या कार्यकर्त्यांनी
‘डॉ. पानतावणेंचे औरंगाबादमध्ये स्मारक उभारणार’ मुंबई : ‘आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत, पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दिवंगत पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मृती चिरंतन जोपासण्यासाठी औरंगाबाद येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल,’ अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय
मुख्यमंत्री-शिवसेना पक्षप्रमुखांची सदिच्छा भेट मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गुरुवारी (२३ मे २०१९) मुंबईत लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी भेट झाली.
‘भाजपने वचन पाळले, फडणवीस सरकारचे अभिनंदन’ मुंबई : ‘सर्व वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे अभिनंदन करतो. भारतीय जनता पक्षाने (भाजप) विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले वचन पाळले आहे,’ अशी प्रतिक्रिया ‘भाजप’ प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी २९ नोव्हेंबर २०१८ रोजी व्यक्त केली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language